बेकायदा स्थलांतर; अमेरिकेत ४४ नागरिकांना अटक   

वॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. लॉस एंजेलिसमधील फेडरल इमिग्रेशन अधिकार्‍यांनी ४४ नागरिकांना अटक केली. दरम्यान, या कारवाईचा निषेध करणार्‍या नागरिकांना पांगवण्यासाठी अधिकार्‍यांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर संघीय अटक केंद्राबाहेर संघर्ष सुरू झाला.
 
गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या यास्मिन पिट्स ओकीफ म्हणाल्या, बेकायदा स्थलांतर, अंमलबजावणी अधिकारी आणि एजंट्सनी तीन ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये दोन किराणा दुकाने आणि एका गोदामाचा समावेश आहे. व्यावसायिक त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी बनावट कागदपत्रे वापरत असल्याचे न्यायाधीशांना आढळून आल्यानंतर व्यावसायिकांच्या घरी झडती घेण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी लॉस एंजेलिसमधील एका संघीय बंदी केंद्राबाहेर मोठ्या संख्येने नागरिक या कारवाईचा निषेध करण्यासाठी जमले. अटक केलेल्यांच्या समर्थनार्थ निदर्शकांनी त्यांना मुक्त करा, त्यांना देशात राहू द्या, अशा घोषणा दिल्या. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.

Related Articles